Breaking News

गिडेगाव प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची अशोक गायकवाड यांची मागणी !

गिडेगाव प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची अशोक गायकवाड यांची मागणी 
नेवासा/तालुका प्रतिनिधी :
 गिडेगाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या हल्ला प्रकरणाची सीआयडीमार्फत तपास करावा अशी मागणी युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव  गायकवाड यांनी केली आहे.
नेवासा तालुक्यातील गिडेगाव येथील अल्पवयीन मुलींवरील हल्ल्याची सीआयडी मार्फत निपक्षपतीपणे चौकशी करून खऱ्या आरोपीला शासन व्हावे,
शेतकऱ्यांना मुबलक खत पुरवठा करण्यात यावा,डीझेल-पेट्रोलच्या किंमती कमी कराव्यात, राजगृहावरील हल्ल्याची सखोल चौकशी व्हावी या विविध मागण्यांसाठी अशोकराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवार दि.17 रोजी नेवासा तहसील कार्यालयावर 
युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे वतीने मोर्चा काढण्यात आला होता.
मोर्चा पूर्वी पत्रकारांशी बोलताना श्री.गायकवाड म्हणाले,हा मोर्चा कोणाच्या विरोधात अथवा कोण्याच्या समर्थनार्थ नाही तर तो न्याय मागण्यांसाठी आहे.गिडेगाव अल्पवयीन मुलीच्या हल्ला प्रकरणी तिच्या चुलत्याला आरोपी म्हणून अटक केली त्याबद्दल ही आमचे काही म्हणणे नाही.तो आरोपी आहे की नाही हे न्यायालय ठरवेल.आम्ही फक्त निपक्षपतीपणे सीआयडी मार्फत चौकशी करून त्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे.तसेच घटनेतील आरोपीच्या मुलीची छेड काढली जात आहे.ती छेडछाडीची फिर्याद देण्यासाठी गेली तर पोलिसांनी तिलाच बेदम मारहाण केली. त्याचबरोबर कोरोना आपत्ती काळात जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या कोरोना वरीअर्सचे धन्यवाद व्यक्त केले,कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या कोरोना योद्धा व सामान्य नागरिक यांना आदरांजली अर्पण केली,कोरोना आपत्ती मुळे बेरोजगार झालेले,विस्थापित झालेल्या कुटुंबाना दरमहा 10 हजार रुपये निर्वाह भत्ता देण्यात यावा,आंबेडकरी समाजाचे व संपूर्ण देशाची अस्मिता आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी बांधलेल्या ज्ञान भांडार असलेल्या राजगृहावरीलहल्ल्याचा तपास करून यामागे कोण आहे,त्याचा हेतू काय आहे याचा शोध घ्यावा,शेतकऱ्यांना मुबलक खत पुरवठा करावा,डिझेल-पेट्रोलची दरवाढ कमी करावी या आणि इतर न्याय मागण्यांसाठी हा मोर्चा आहे.
नेवासा बस स्थानका पासून मोर्चाला सुरुवात झाली.कोरोना आपत्ती नियमांचे पालन करून मोर्चा काढण्यात आला.
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व पोलिस निरिक्षक रणजित डेरे यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदनावर घटनापती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रवी भालेराव,काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रवीण साळवे,आरपीआय तालुकाध्यक्ष सुशील धायजे,राजेंद्र वाघमारे यांच्या सह्या आहेत.                 
    यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, विजय गायकवाड , शामराव सोनकांबळे,आदींची भाषणे झाली. नितीन गायकवाड प्रवीण वंजारे, येडू सोनवणे, मुन्ना चक्रनारायण, जाकीर शेख,नितीन मिरपगार, पप्पू कांबळे,गणपत मोरे, अॅड.सादिक शिलेदार, भास्करराव लिहिणार,नितीन गायकवाड, नितीन भालेराव, बाबासाहेब साळवे, आनंद साळवे, यांसह अनेक कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.