Breaking News

चांदेकसारे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाचे विजय होन बिनविरोध !

चांदेकसारे ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाचे विजय होन बिनविरोध !
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
        कोपरगाव तालुक्यातील  चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी विजय केशवराव होन  यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
 चांदेकसारे ग्रामपंचायत ची उपसरपंच पदाची निवड  ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पुनम सुनिल खरात यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास अधिकारी  प्रल्हाद सुखेकर यांच्या उपस्थितीत  संपन्न झाली
       कोल्हे गटाच्या ताब्यात असलेल्या या ग्रामपंचायतचे  उपसरपंच पदाचे रोटेशन ठरल्या प्रमाणे उपसरपंचपदी असलेले अशोक हरीभाऊ होन यांचा अडीच वर्षाचा कार्यकाल संपल्याने त्यांनी  आपल्या  उपसरपंच पदाचा राजीनामा दिला रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवड करण्यासाठी मिटींग घेण्यात आली त्यात उपसरपंच पदासाठी एकमेव विजय केशवराव होन यांचाच अर्ज आल्याने त्यांच्या नावाची सुचना  अशोक होन यांनी  मांडली व चांदेकसारे ग्रामपंचायतच्या पुढील अडीच वर्षासाठी उपसरपंचपदी विजय होन यांची बिनविरोध निवड करण्यात आली 
निवडी प्रसंगी  ग्रामपंचायतच्या तेरा सदस्यांपैकी दोन सदस्य गैरहजर होते तर सहकार महर्षि शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय होन ,माजी सरपंच केशवराव होन,किरण होन,रावसाहेब होन,भाऊसाहेब होन,अॕड.ज्ञानेश्वर होन  सह ग्रामस्थ उपस्थित होते.याप्रसंगी नुतन उपसरपंच विजयराव होन म्हणाले की सन २०१८ मध्ये  आमचे आधारस्तंभ माजी मंत्री शंकरराव कोल्हे,साईबाबा संस्थानचे विश्वस्त बिपीनदादा कोल्हे,माजी आमदार स्नेहलता कोल्हे,युवा नेते औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायतची सत्ता मिळवत गावविकासाला प्राधान्य दिले त्यांच्याच आधीपत्याखाली ग्रामस्थांनी मला उपसरपंच पदी निवड करुन जो विश्वास दाखविला त्या विश्वासास सर्व सदस्यांना बरोबर घेऊन गाव विकास करुन ग्रामस्थांचा विश्वास सार्थ ठरविणार असल्याचे नुतन उपसरपंच विजय होन यांनी सांगितले.