Breaking News

शिक्षक बँकेतील घड्याळ खरेदी व्यवहार संशयास्पद,संचालकांना जेलमध्ये पाठवु -- माळवे.

शिक्षक बँकेतील  घड्याळ खरेदी  व्यवहार संशयास्पद,संचालकांना जेलमध्ये पाठवु -- माळवे.
( लेखा परिक्षकांनीही मारले ताशेरे )
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी :
अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेतील विद्यमान सत्ताधार्‍यांनी सभासदांना शताब्दी भेटीकरिता घड्याळ भेट देण्याचा निर्णय घेतला. या घड्याळखरेदीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप सत्ताधा-यांवर होत असताना व या प्रकरणाची जिल्हा उपनिबंधकांनी चौकशीचे आदेश दिलेले असताना आता घड्याळ खरेदी प्रकियेवर बँकेच्या लेखापरिक्षकांनीच ताशेरे ओढल्यामुळे ही घड्याळ खरेदी वादाच्या भोवर्‍यात अडकली आहे.  अशी माहीती सदिच्छा मंडळाचे जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर माळवे यांनी दिली.घड्याळ खरेदी करिता काढलेली निविदा ही राज्य किंवा राष्ट्रीय पातळीवरील वर्तमानपत्रात प्रसिद्ध न करता स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध केली होती. तरीही त्या निविदेची कात्रणे कुणाच्या माध्यमामधून गुजरातमधील कंपनीपर्यंत पोहोचली.
त्याच हितसंबंधातून स्थानिक किंवा महाराष्ट्रातील अजंता कंपनीच्या डिलर ऐवजी चार पैकी तीन निविदा थेट गुजरातमधून भरल्या जातात व फक्त एकच निविदा नगरमधून भरली जाते. याचे गौडबंगाल काय? याच प्रश्नाचे समाधानकारक उत्तर संचालक मंडळाला लेखापरिक्षकांसमोर देता आलेले नाही. दिनांक 17 डिसेंबर 2019 च्या संचालक बैठकीतील ठराव क्र.21 अन्वये ज्या कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली. त्या कंपनीस निगोशिएशन करिता बोलावण्याचे ठरले परंतु ठरलेल्या तारखेस कंपनीचा कुणीही प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही. तरीही केवळ कंपनीने पाठवलेल्या ई- मेलवर किंमत ठरवण्यात आली. रुपये 72 लाख कंपनीला अ‍ॅडव्हांस देण्यात आला. म्हणजेच वस्तू ताब्यात येण्याआगोदरच 6 महिने रकमा बँकेकडून कंपनीला देण्यात आली
याबाबतही सत्ताधारी या निविदा धारकावर एवढे मेहेरबान का झाले असतील ? असा प्रश्न लेखापरिक्षणात उपस्थित करण्यात आला आहे. दिनांक 17 डिसेंबर 2019 च्या पत्रानुसार शिक्षक बँकेने अजंता एल एल पी कंपनीस घड्याळ खरेदीची ऑर्डर देण्यात दिली. त्यानुसार घड्याळे शिक्षक बँकेत पोहोच होण्यापुर्वीच 72 लाख रूपये कंपनीस अगाऊ अनामत म्हणून देण्यात आले. एवढी मोठी रक्कम बँकेने एकाच वेळी देणे चुकीचे असल्याचे या लेखापरीक्षण अहवालात म्हटले आहे. यासह अनेक प्रश्न या खरेदीव्यवहारात लेखापरिक्षकांनी उपस्थित केलेले आहेत. एवढी मोठी रक्कम अगाऊ देऊनही घड्याळे ठरलेल्या वेळी पोहोच न होता तब्बल तीन महिने उशीरा आली. याबाबतही बँकेने कुठलीही कारवाई कंपनीविरोधात केली नाही किंवा तसा पत्रव्यवहारही बँकेने त्या डिलरशी केला नाही.
केवळ माया जमविण्याच्याच उद्देशाने ही घड्याळ खरेदी गुजरातमधून केली असल्याचा  केला आहे.  कुणाच्या नातेवाईकाने वैयक्तिक हित संबंध जोपासून सत्ताधा-यांना याचा आर्थिक लाभ करून दिला आहे