Breaking News

भातकुडगाव हायस्कूलमध्ये कु.अमृता सखाराम वडणे १० वी च्या परिक्षेत प्रथम !

भातकुडगाव हायस्कूलमध्ये कु.अमृता सखाराम वडणे १० वी च्या परिक्षेत प्रथम
 घोटण/प्रतिनिधी: 
जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे भातकुडगाव हायस्कूलमध्ये मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या १० वी च्या परिक्षेत कु.अमृता सखाराम वडणे या विद्यार्थ्यांनीने ९२.८०% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे तर प्रियंका शंकर गाढे हिने ८९.६०% गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला असून तृतीय क्रमांक पल्लवी विष्णू जमधडे हिने ८९.२०% मिळविला आहे विद्यालयाचा ८९.२८% निकाल लागला आहे. अक्षय रामचंद्र नजन याने विज्ञान विषयात १०० पैकी ९६ गुण मिळवून विज्ञान विषयात प्रथम क्रमांक मिळवत एकूण ८७% गुण मिळविले. महाविद्यालयाचे प्राचार्य त्रिंबक जाधव सर यांनी प्रथम क्रमांक मिळवलेल्या कु.अमृता वडणे हिला व पालक सखाराम वडणे यांना शुभेच्छा देऊन सर्व शिक्षक व इतर कर्मचारी यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.