Breaking News

पत्रकाराला दमबाजी करून झाडे तोडणाऱ्या गावगुंडांवर गुन्हा दाखल !

पत्रकाराला दमबाजी करून झाडे तोडणाऱ्या गावगुंडांवर गुन्हा दाखल
निमगांव खैरी/प्रतिनिधी :
 श्रीरामपूर तालुक्यातील निमगांव खैरी येथील दै. लोकमंथनचे पत्रकार लक्ष्मण साठे त्यांच्या घरासमोर असताना गावातील गावगुंड विजय परदेशी, मधुकर दणके, राहुल नरोडे हे तेथे आले आणी वादाला कुठलेही कारण नसताना त्यांच्या घरासमोरील कुंपनाची झाडे तोडण्यास सुरवात केली. विचारपुस करण्यास साठे गेले असता त्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली असता श्री.साठे घाबरत घाबरत तालुका पोलीस ठाण्यात हजर होऊन या गावगुंडाबाबत पोलीस निरीक्षक मसुद खान यांच्यासमोर सर्व तक्रारीची माहीती दिली. सदर प्रकरणाची शहानिशा करून पोलीस निरीक्षक मसुद खान यांनी या गावगुंडाना पोलीस ठाण्यात आणत त्यांचेवर र.न.१८६० नुसार भा.द.वी. कलम ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
    दरम्यान येथील अशोक झुराळे यांचे मालकीच्या गट नंबर २५ मधील एक एकर क्षेत्र विजय परदेशी यास विक्री केले त्यावेळी  मंडळ अधिकारी उंदीरगाव यांनी स्वतः हजर राहून त्यास खुना करून दिल्या असताना गुन्हेगारी पार्श्वभुमी असल्याने तो पुन्हा दहशत करण्यास आला होता. मात्र पोलीस अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे साठे बचावले तरी ते कुटूंब दहशतीखाली आहे.