Breaking News

देवळाली प्रवरात महसुल मंडळात कोरोनाचा शिरकाव, राहुरी कारखाना येथे व्यापाऱ्यास कोरोनाची बाधा !

देवळाली प्रवरात महसुल मंडळात कोरोनाचा शिरकाव, राहुरी कारखाना येथे व्यापाऱ्यास कोरोनाची बाधा ! 
देवळाली प्रवरा प्रतिनिधी :
                      देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीतील महसुल मंडळात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. महसुल मंडळातील गाव कारभारीला कोरोनाची बाधा पोहचली आहे. त्यांचा सहकारी यास स्ञाव तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. महसुल मंडळातील कोरोनाचा शिरकाव झाल्याने या खात्याशी शेतकऱ्यांचा दांडगा संपर्क असून संपर्क आल्याने अनेक शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे.राहुरी कारखाना येथील कराळेवाडीतील एका भागात व्यापाऱ्यास कोरोना बाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे देवळाली प्रवरा नगर पालिका हद्दीत एकुण   12 रुग्ण  कोरोना बाधित झाले आहेत.
                  देवळाली प्रवराचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी आण्णासाहेब मासाळ  व मुख्याधिकारी अजित निकत  यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की,देवळाली प्रवरा महसुल मंडळातील एक कर्मचारी व त्यांची मुलगी कोरोना बाधित असल्याचा अहवाल उपलब्ध झाला आहे. त्या महसुल  मंडळातील कर्मचाऱ्यांसोबत  चार व्यक्ती काम करीत असल्याची माहिती पुढे येत आहे.या कर्मचाऱ्यांच्या कायम सोबत राहणारा एक कर्मचाऱ्यांस स्ञाव तपासणीसाठी विद्यापीठात पाठविण्यात आले आहे.महसुल कर्मचारी हा देवळाली प्रवरा येथे नोकरीस आहे पण त्याचे रहिवाशी ठिकाण राहुरी येथे आहे.