Breaking News

नेवासा येथे कोविड केयर सेंटरच्या विलगीकरण कक्षातील लोकांना प्राणायामचे धडे !

नेवासा येथे कोविड केयर सेंटरच्या विलगीकरण कक्षातील लोकांना प्राणायामचे धडे
घाबरून न जाता प्रतिकारशक्ती वाढवून कोरोनाला हद्दपार करा-नितीन दिनकर यांचे आवाहन

नेवासा/तालुका प्रतिनिधी :
    कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला म्हणून घाबरून जाऊ नका मनातील भीती काढून टाका व प्रतिकार शक्तीच्या जोरावर कोरोनाला हद्दपार करा असे आवाहन भाजपचे नेवासा तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांनी केले त्यांनी विलीनीकरण कक्षातील रुग्णांशी संवाद साधत हवी ती मदत मागा मी द्यायला तयार आहे अशी साद घालून विलगीकरण कक्षातील रुग्णांना दिलासा दिला.
           नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयासमोर असलेल्या शासकीय मुलींच्या तीन मजली वसतिगृहाला 
कोविड केयर सेंटर निर्माण करण्यात आलेले आहे प्रत्येक रूममध्ये कोरोनाशी संक्रमित रुग्णांना रहाण्याची खास व्यवस्था करण्यात आली असून डॉक्टरच्या टीम मार्फत चांगली व तत्पर सेवा देऊन अहोरात्र मेहनत घेण्याचे काम तहसीलदार रुपेश सुराणा तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी,श्वास हॉस्पिटलचे प्रमुख हदयरोग तज्ञ डॉ.अविनाश काळे,आयुर्वेदाचार्य डॉ.प्रणव जोशी हे
 करत आहे.
     कोविडशी संक्रमित रुग्णांशी संपर्कात आलेल्यांना सुमारे अठरा जणांना नेवासा येथील विलगीकरण ठेवण्यात आलेले आहे.दररोज सकाळी योग शिक्षक डॉ.प्रणव जोशी हे योगाचे धडे देत असल्याने मनोधैर्य उंचावत आहे. कोरोनाशी लढण्यासाठी नवीन ऊर्जा विलगीकरण कक्षात ठेवलेल्या लोकांना मिळत आहे.श्वासाच्या प्राणायामसह योग येथे शिकवले जातात.प्रशिक्षक हे गेट प्रांगणात उभे राहून सोशल डिस्टनसिंगचे पालन करत माईकवरून इमारतीतील लोकांशी संवाद साधून प्राणायमचे प्रशिक्षण देत आहे.
    यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष नितीन दिनकर यांनी प्राणायम प्रसंगी सहभाग नोंदवून विलगीकरण कक्षातील लोकांना दिलासा दिला कोरोनाला घाबरून जाऊ नका,योग व प्राणायामच्या माध्यमातून प्रतिकारशक्ती वाढवा व कोरोनावर विजय मिळवा असे सांगतानाच आपण सर्वजण कुटुंबातील सदस्य आहेत असे समजून काही गरज पडल्यास माझ्या नंबरवर फोन करा व आवश्यक वस्तूंची मागणी करा,नियमांचे पालन करा डॉक्टरांनी दिलेल्या सूचनांचे पालन करा असे आवाहन त्यांनी यावेळी माईकवरून सुसंवाद साधतांना केले तर या कार्यात योध्दा बनून अहोरात्र नेवासा तालुक्यावर नजर ठेवून काम करणाऱ्या तहसीलदार रुपेश सुराणा व आरोग्य अधिकारी डॉ.अभिराज सूर्यवंशी यांचे आभार मानून त्यांच्या कार्याचे नितीन दिनकर यांनी कौतुक केले
     पहाटेच्या सुमारास झालेल्या योग प्राणायाम प्रसंगी नितीन दिनकर यांच्यासह योग शिक्षक आयुर्वेदाचार्य डॉ.प्रणव जोशी,डॉ.राहुल चव्हाण,अतुल कु-हाडे कोविड सेंटरवर देखरेख करणारे कर्मचारी उपस्थित होते.