Breaking News

राशीन भागातील ६० वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह !

राशीन भागातील ६० वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह
कर्जत / प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील राशीननजीकच्या तांबे वस्ती येथील एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ही व्यक्ती ६० वर्षीय महिला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड यांनी दिली.

गेल्या काही आठवड्यांपूर्वी राशीन येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. प्रशासनाच्या अथक परिश्रमानंतर हा परिसर नियंत्रणाखाली आला. मात्र आता पुन्हा राशीन भागात कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.