Breaking News

नेवाशात वैद्यकिय अधिकाऱ्यासह सत्तर वर्षिय महिला नगरसेविका कोरोना बाघित ! तालूक्यात कोरोनाचे 'भूत' कायम !

नेवाशात वैद्यकिय अधिकाऱ्यासह सत्तर वर्षिय महिला नगरसेविका कोरोना बाघित ! तालूक्यात कोरोनाचे 'भूत' कायम !
नेवासा तालुका प्रतिनिधी :
नेवासा तालूक्याला कोरोनाचे महासंकट सध्या तात्याविंचू सारखे भूत मानगटीवर बसून असल्याचे मंगळवार (दि. २८) रोजी तालूका आरोग्य विभागाला आलेल्या अहवालातून दिसून येत अाहे
मंगळवारी आलेल्या अहवालात नेवासा शहरात नविन ८  रुग्णांची भर पडली आहे त्यामध्ये नेवासा येथील सरकारी वैद्यकिय अधिकाऱ्यासह एका ७० वर्षिय नगरसेविकेचा अहवाल कोरोना बाधित  आलेला आसल्यामुळे शहरासह तालूक्यात खळबळ उडाली आहे. तसेच २५ वर्षिय महिलाही  कोरोना बाधीत झाल्याने आजाराशी झुंज देत आहे.तर पुरुषांमध्ये एका १७ वर्षाच्या मुलाचा समावेश आहे,तर दुसऱ्या  एका ३३ वर्षाच्या युवकही कोरोना बाधीत झालेला आहे. एक ५० वर्षाचा इसमही कोरोनाच्या आजारात पच्छाडलेला असल्याचे आरोग्य विभागाला आलेल्या अहवालात दिसून येत आसल्याने नेवासकरांची धाकधूक कायम असल्याने आरोग्य विभाग या अहवालातून खडबडून जागा झाला आहे.
   तालूका आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या मंगळवार (दि.२८) रोजीच्या अहवालात आजपर्यंत कोरोनाशी झुंज देत असलेल्या ४ जणांचा मृत्यु झालेला असून दिलासादायक बाब म्हणजे ८९ जण कोरोना मुक्त झाल्याचे या अहवालातून उघड झाले आहे.तर ३२ जणांवर सध्या उपचार सुरु असून कोरोनाचा नायनाट करण्यासाठी तालूका आरोग्य विभाग मोठा सतर्क झालेला आसून तालूका आरोग्य अधिकारी डॉ अभिराज सुर्यवंशी परिस्थितीवर  नियंञन ठेवून आहेत.