Breaking News

प्रा.मतिन इनामदार यांचे दुःखद निधन !

प्रा.मतिन इनामदार यांचे दुःखद निधन
कोपरगांव / तालुका प्रतिनिधी 
संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इलेक्ट्राॅनिक्स अँड  टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील प्रा. मतिन इनामदार (वय ३५ वर्षे ) यांचे मंगळवार दि. १४ जुलै रोजी  पुणे येथिल एका हाॅस्पिटल मध्ये उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात  आई, वडील, पत्नी व ५ वर्षांचा  मुलगा आहे.
कै. प्रा. इनामदार यांनी संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निक मधुन इलेक्ट्राॅनिक्स अँड  टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींगचा  डीप्लोमा केला. याच शाखेत  संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातुन पदवी व पदव्युत्तर शिक्षण   घेवुन संजीवनी पाॅलीटेक्निक मध्ये ऑगस्ट , २०१०  मध्ये मध्ये लेक्चरर पदावर रूजु झाले. त्यानंतर व्यवस्थापनाने त्यांना संजीवनी अभियंत्रिकी महाविद्यालयामध्ये पदोन्नती दिली. मागील दीड आठवड्यापासून  ते आजारी होते. त्यात उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या या अचानक जाण्याने संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या भव्य परीवारामध्ये शोककळा  पसरली आहे.


‘ प्रा. इनामदार यांचे शिक्षण  संजीवनी मध्येच झाले आणि त्यांनी येथेच सेवा देण्याचे ठरविले. यामुळे ते संजीवनी कुटूंबाचे सदस्य होते. मृत्यु हा अटळ असतो परंतु त्यांच्या इतक्या लवकर जाण्याने आम्ही एक कर्तृत्ववान प्राद्यापक गमविला आहे. याचे दुःख त्यांच्या कुटूंबियांबरोबरच संपुर्ण संजीवनी परीवाराला आहे.’,
-------------
 -श्री. नितीनदादा कोल्हे, कार्याध्यक्ष, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स .

‘ कै. प्रा. इनामदार हे सतत नाविण्याचा शोध  घेत आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रातील नवनवीन प्रयोग करायचे. त्यांच्या ज्ञानाचा विध्यार्थ्यांना  चांगला फायदा होत असे. आपल्या शंकांचे  निरसण होणेसाठी  विध्यार्थ्यांना  ते नेहमी हवेहवेसे वाटायचे. कोणत्याही प्रयोगात त्यांनी कधी माघार घेतली नाही परंतु मात्र दीड आठवडा मृत्युशी  कडवी झुंज देत अखेर त्यांना माघार घ्यावी लागली, हा नियतीचा खेळ त्यांच्या कुटूंबियांइतकाच संपुर्ण संजीवनी परीवाराला वेदनादायी आहे. त्यांच्या कुटूंबियांना व संजीवनी परीवाराला या दुःखातुन सावरण्याची परमेश्वर शक्ती देवो, हीच अपेक्षा.’,- 
------------
श्री. अमित कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स .