Breaking News

'अभिनव' चा दहावीचा निकाल १०० टक्के !

'अभिनव' चा दहावीचा  निकाल १००  टक्के  
अकोले प्रतिनिधी 
- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च  २०२० मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.  त्यात अकोले येथील अभिनव शिक्षण संस्थेच्या मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलचा एकूण निकाल १०० टक्के लागला. त्यात   स्कूल  च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. 
 त्यात कु श्रुती दिलीप जाधव   या   विद्यार्थिनीने ९६ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकाविला तर  कु. अनुष्का सुजित खिलारी  हिने ने ९३.६०  टक्के   गुण मिळवून द्वितिय तर  शुभम एकनाथ तोडकर ,श्रीजा शरद वाकचौरे आणि  जन्मंजय विवेककुमार वाकचौरे  यांनी सारखेच ९२.६०   टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.
१४  विद्यार्थ्यांना ९० टक्के पेक्षा अधिक गुण आहेत तर  ४९ विद्यार्थी ७५ ते ९० टक्के गुण मिळवून यशस्वी झाले. १९ विद्यार्थी ६० ते ७४ टक्के गुण मिळवून  फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण झाले.   विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले , उपाध्यक्ष सुरेश कोते , सचिव प्राचार्य रमेशचंद्र  खांडगे   खजिनदार भाऊसाहेब नाईकवाडी   मारुतीराव कोते अभिनव पब्लिक स्कूलच्या प्राचार्या अल्फोन्सा डी., प्राचार्या अपर्णा श्रीवास्तव,  प्रा. गुंजाळ , दिलीपकुमार मंडलिक आदींनी अभिनंदन केले. 
--