Breaking News

चासनळी विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम !

चासनळी विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
पुणे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मार्च २०२० मध्ये घेतलेल्या एस. एस. सी, परीक्षेचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहिर केला आहे. रयत शिक्षण संस्थेचे कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील मारुतीराव  दगडुजी तिडके पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
या विद्यालयाचा एस. एस. सी. परीक्षेचा निकाल ९८.३१ टक्के लागला असुन. गाढे सौरभ राजेंद्र ९४.२० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. चांदगुडे श्रेयस सुरेश  ९४.०० द्वितीय, तर सानप प्रसाद दिनेश व शिंदे निशा मच्छिंद्र  (९०.८० टक्के) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. विद्यालयात विशेष प्राविण्य श्रेणीत ६७, प्रथम श्रेणीत ४७ व द्वितीय श्रेणीत ३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या सर्व यशस्वी विद्याथ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे प्रकाश  तिडके, साहेबराव तिडके, भास्करराव चांदगुडे, सिताराम गाडे, सचिन  चांदगुडे. मनेष  गाडे माजी मुख्याध्यापक व्ही.एन.जामदार, प्राचार्य सुधाकर कोकाटे , पर्यवेक्षक सी. डी. रोटे, स्कूल कमिटी सदस्य व पालकांनी अभिनंदन केले