Breaking News

नेवासा, पाथर्डी, शेवगाव तालुक्यात अतिवृष्टी, पिके पाण्याखाली, नदीनाल्यांना पूर !

नेवासा, पाथर्डी, शेवगाव तालुक्यात अतिवृष्टी, पिके पाण्याखाली, नदीनाल्यांना पूर !
अहमदनगर/ प्रतिनिधी
जिल्ह्यातील नेवासा, पाथर्डी व शेवगाव तालुक्याच्या काही भागात गुरुवारी रात्री अतिवृष्टी झाली. या पावसाने शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत. ओढेनाल्यांना पूर आल्याने रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते.
नेवासा शहरासह तालुक्यात गुरुवारी रात्री ढगफुटीसदृश मुसळधार पाऊस कोसळला. पावसाने ओढ्या नाल्यांना अक्षरश: पूर आला होता. अनेक ठिकाणी रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. पिके पाण्याखाली गेल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले. तालुक्यातील वडाळा मंडल विभागामध्ये सर्वाधिक १३५ मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला. नेवासा खुर्द येथे १२० तर सलाबतपूर येथे १२६ मिलीमीटर एवढ्या उच्चांकी पावसाची नोंद झाली. पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी येथे औरंगाबाद-बारामती महार्गावर कच्चा पूल वाहून गेला असून, शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. या पावसाने सर्व पिके पाण्याखाली गेल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.