Breaking News

बियाणे कंपनीच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

कोपरगाव / प्रतिनिधी : 
      कृषीधन प्रायव्हेट लिमिटेड, जालना या बियाणे कंपनीने कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव, संवत्सर,ओगदी व इतर गावातील शेतकऱ्यांना के.एस.एल.४४१ या सोयाबीनच्या निकृष्ट वाणाची जून महिन्यात विक्री केली होती. शेतकऱ्यांनी या बियाणाची पेरणी केल्यानतर १० ते २० टक्केच उगवण झाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली हे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी कोपरगावचे तालुका कृषी अधिकारी अशोक यादवराव आढाव यांनी कृषीधन प्रायव्हेट लिमिटेड, जालना या कंपनीच्या पुणे येथील मुख्य कार्यालयाचे व्यवस्थापक दगडू नानाभाऊ अंभोरे यांच्यावर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी दि.३ रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन इंगळे करीत आहे .