Breaking News

यशवंत गाडे विद्यालयाचा १०० टक्के निकाल !

यशवंत गाडे विद्यालयाचा १०० टक्के निकाल
केडगाव/प्रतिनिधी : 
फकिरवाडा ( मुकुंदनगर ) येथील यशवंतराव गाडे माध्यमिक विद्यालयाचा निकाल १oo टक्के लागला .विद्यालयातील ६३च्या ६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन या
विद्यार्थ्यापैकी ७ विद्यार्थी विशेष योग्यता तर २७ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले . ओंकार वासुगडे हा ८८ .४० टक्के गुण मिळवुन प्रथम तर सोफिया पिंजारी ८४ .६० टक्के गुण मिळवुन दुसरी तर अरिबा शेख ८४ टक्के गुण मिळवत तिसरी आली .
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गाडे , सचिव प्रा . शशिकांत गाडे , सहसचिव रमाकांत गाडे , उपाध्यक्ष एम .पी.कचरे , खजिनदार तथा शालेय समितीचे अध्यक्ष संजय गाडे , मुख्याध्यापिका श्रीमती हेमलता बनकर यांनी अभिनंदन केले आहे .