Breaking News

निघोज येथे जुगार अड्ड्यावर कारवाई पाच जणांना अटक !

निघोज येथे जुगार अड्ड्यावर कारवाई पाच जणांना अटक
----
५ हजार ९२० रोख रक्कम जुगाऱ्याकडून जप्त !
-----
पारनेर पोलिसांची  धडक कारवाई !
---
पारनेर प्रतिनिधी- 
     पारनेर तालुक्यातील निघोज येथे मोठ्या प्रमाणात जुगार खेळला जात आहे गेल्या काही दिवसांपूर्वीच येथे पोलिसांनी प्रतिष्ठित जुगाऱ्याना ताब्यात घेतले होते त्यानंतर दि.26 रोजी पुन्हा पारनेर पोलिसांनी केलेल्या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 5920 रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
   निघोज येथील माधव विठ्ठल गजरे, बाबाजी भाऊ शेटे, बाबाजी रखमा ढवण, राजेश शंकर ठोंबरे, खंडू लक्ष्मण ढवण, हे निघोज येथे जुगार खेळत असताना पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये ताब्यात घेतले आहेत त्यांच्याकडून 5920 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
    पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार निघोज येथे जुगार खेळत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहिती नुसार पोलीस उपनिरीक्षक विनयकुमार बोत्रे यांच्या पथकाने निघोज येथे ही कारवाई केली या कारवाईमध्ये पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत पो.ना.श्याम सुंदर गुजर महिला पोलिस कॉन्स्टेबल चित्रा जगदाळे होमगार्ड गुळवे सालके यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.