Breaking News

खर्डा येथील कोरोनाबाधीतचा बार्शी येथे मृत्यू ,घाबरू नका, सतर्क रहा : - तहसिलदार विशाल नाईकवाडे

खर्डा येथील कोरोनाबाधीतचा बार्शी येथे मृत्यू ,घाबरू नका, सतर्क रहा : - तहसिलदार विशाल नाईकवाडे
जामखेड प्रतिनिधी 
तालुक्यातील खर्डा येथील कोरोनाबाधीत रूग्णाचा बार्शी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सदर रूग्णांच्या संपर्कातील दहा व्यक्तींचे स्त्राव तपासणीसाठी पाठविले असून त्यांना जामखेड शहरातील आरोळे हाॅस्पीटलच्या संस्थात्मक विलिनीकरण कक्षात कोराँन्टाईन केले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून खर्डा गावातील त्या मयत व्यक्तीच्या राहत्या घराची गल्ली सिल केली आहे अशी माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी दिली आहे. 
सदर रूग्णाचे इतर आजारांच्या उपचारासाठी बार्शी येथील खाजगी रुग्णालयात जाणे येणे होते. दरम्यान च्या काळात कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर बार्शी तेथेच उपचार सुरू असताना दि २७ रोजी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
तसेच मिरजगाव (ता कर्जत) येथील एका कोरोना बाधित आढळून आली त्यांच्याकडे घरभाड्याने राहणारे डिसलेवाडी (ता जामखेड) येथील चार जामखेड आले. त्यांचा प्रशासनाने शोध घेऊन चार जणांचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला असुन त्यांनाही कोरोनटाईन केले आहे. जामखेड शहरासह तालुक्यात कोरोना अँक्टीव्ह रूग्ण नाहीत तरीही  प्रशासनाकडून सर्व स्तरावर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहेत. असे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी सांगितले.