Breaking News

कोपरगाव नगराध्यक्ष, यांनी पाठवले मुख्यमंत्र्यांना पत्र !

कोपरगाव नगराध्यक्ष, यांनी पाठवले मुख्यमंत्र्यांना पत्र !
करंजी प्रतिनिधी-
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपालिकेचे अपक्ष नगराध्यक्ष मा श्री विजयराव सूर्यभान पा वाहडणे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा श्री  उद्धवसाहेब ठाकरे यांना गणेशोत्सव संबंधी पत्र पाठवले आहे.
   यात त्यांनी असे म्हटले आहे की आपणांस मी कोपरगाव चा प्रथम नागरिक म्हणून असे निवेदन करतो की, घातक कोरोना  व्हायरस चा कहर संपूर्ण राज्यात दिवसेंदिवस वाढतांना दिसून येत असतानाच येणाऱ्या कालावधीत विविध समाजाचे सणासुदीचे दिवस असल्याने खरेदीच्या नावाखाली मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर येत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग वाढून अतिशय मोठ्या प्रमाणात हाहाकार माजतो की काय अशी शंका येते, प्रशासनावरील ताण तणाव देखील वाढला असून कोरोनाचे संकट आल्यापासून महाराष्ट्रात सर्व धर्मियांचे सण उत्सव शासकीय कार्यक्रम जयंती पुण्यतिथी चे कार्यक्रम शासकीय आदेशानुसार सर्वांनीच सार्वजनिक रित्या साजरे न करता साध्या पध्दतीने सोशल डिस्टनसिंग चे पालन करत साजरे केले.सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य केल्या मुळेच काही केसेस सोडल्या तर इतर शहराच्या तुलनेत कोपरगाव शहरात कोरोनाचे रुग्ण कमी आढळून आले आहे.
   तसेच येणाऱ्या काळात प्रशासकीय यंत्रणेवर कामाचा ताण वाढू नये प्रशासनाच्या सोशल डिस्टनसिंग च्या नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी येणारा  गणेशोत्सव सार्वजनिक रित्या साजरा न करता सर्वांनी कौटुंबिक स्तरावर साजरा करावा असा शासन आदेश महाराष्ट्र शासनाने काढावा अशा आशयाचे निवेदन मा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मा गृहमंत्री अनिल देशमुख,मा आमदार आशुतोष काळे व मा जिल्हाधिकारी अहमदनगर यांना पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे.
   कोणत्याही समाजाच्या धार्मिक भावना दुखवण्याचा माझा हेतू नसून केवळ धार्मिक भावनांचा विचार न करता सर्वांचे आरोग्य व जीवितासाठी सर्वांनीच समाज आणि राष्ट्रहिताचा विचार करणे हे या संकटाच्या काळात महत्त्वाचे असून येणाऱ्या गणेशोत्सवात एक गाव एक गणपती ही संकल्पना स्तुत्य उपक्रम असून ज्या प्रमाणे शासनाने मुस्लिम बांधवांना कोरोना च्या काळात  सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करण्यास बंदी घातली आहे त्याच अनुषंगाने शासनाने आपल्या स्तरावरून शासन निर्णय घेऊन या उपक्रमाची राज्यात अंमलबजावणी करायला हवी जेणे करून हिंदू मुस्लिम समाजाला समान न्याय मिळेल अशी आशा बाळगतो आशा आशयाचे निवेदन पत्र नगराध्यक्ष श्री वाहडणे यांनी पाठवले आहे.