Breaking News

शिवशंकर विद्यालयाचा एस.एस.सी.परीक्षेचा निकाल ९९.४२ टक्के !

शिवशंकर विद्यालयाचा एस.एस.सी.परीक्षेचा निकाल ९९.४२ टक्के 
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
कोपरगाव तालुक्यातील   रयत शिक्षण संस्थेच्या, रवंदे येथील शिवशंकर विद्या मंदिर चा मार्च, 2020 माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल ९९.४२ टक्के  लागला असल्याची  माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सांगळे बी. के.यांनी दिली.
  विद्यालयात प्रथम  कु.काळे चैताली शंकर  ५०० पैकी ४७७ गुण मिळवत ९५.४० टक्के द्वितीय 
 कु.उगले पल्लवी आबासाहेब ५०० पैकी ४७३ गुण ९४.६० टक्के तृतीय कु.कदम तृप्ती रवींद्र ५०० पैकी ४६६ गुण ९३.२० टक्के 
वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन माननीय श्री.बाळासाहेब कचरू पा.कदम, सदस्य श्री.पी.डी.काळे व श्री.साहेबराव काशिनाथ पा. कदम, सरपंच सौ.कविताताई सोनवणे,श्री.संजय कंक्राळे,श्री.बाबासाहेब घायतडकर, श्री.अशोक मामा काळे, श्री.सुभाष दवंगे, मुख्याध्यापक श्री.सांगळे बी.के, पर्यवेक्षक श्री बिरे बी.आर.आणि सर्व सेवक वृंद, तसेच पंचक्रोशीतील शिक्षण प्रेमी ग्रामस्थांनी अभिनंदन केले