Breaking News

करंजी विद्यालयाची इ १० च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम !

करंजी विद्यालयाची इ १० च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम !
  
करंजी प्रतिनिधी-
कोपरगाव तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर शंकररावजी काळे  माध्यमिक विद्यालय ,करंजी बुद्रुक या विद्यालयाचा इयत्ता १० वी चा  निकाल शेकडा ९५.८३% टक्के इतका लागला. 
   महाराष्ट्र राज्य माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे मार्फत घेण्यात आलेल्या मार्च २०२० मधील एस एस सी परीक्षेचा निकाल ९५.८३% टक्के इतका लागला असून विद्यालयात तब्बल २९ विद्यार्थी हे विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाले तर  २६ विद्यार्थ्यां प्रथम श्रेणीत तर  १२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत पास झाले आहे.
   यात कु रितेश भाऊसाहेब आगवन व कुमारी साक्षी अण्णासाहेब कापसे हे दोन विद्यार्थी ९१.६० %  गुण घेऊन विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले.  तसेच द्वितीय क्रमांक कुमारी साक्षी दत्तात्रय भिंगारे ९०.६०% व तृतीय क्रमांक  कुमारी अश्विनी अनिल चरमळ  .८९.२०% गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहे .
   सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे अभिनंदन रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार समितीचे अध्यक्ष मा.आ. श्री आशुतोषजी काळे साहेब , रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य तथा विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन श्री.कारभारी आगवन, जिल्हा परिषद सदस्या सौ विमलताई आगवन, स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य डॉ. श्री सुनील देसाई, श्री सांडू भाई  पठाण, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री संजय आगवण, रयत लक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन श्री मुकुंद आगवन तसेच समस्त करंजी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी  अभिनंदन करत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या तसेच या यशात खारीचा वाटा असलेले  विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री दिनकर माळी, सौ अनाप ए. एम., श्री चौधरी बी बी,श्री सांगळे जी.डी.,श्री जगताप एल.पी. ,   चव्हाण एस. डी.श्री वसावे व्ही.  आर.श्री सरोदे ए. व्ही.व श्री  डोखे  जी.एस.  या सर्वांचे मार्गदर्शन लाभले यांचे ही अभिनंदन मान्यवरांनी केले.