Breaking News

संगमनेरात दिवसभरात ४० कोरोना पॉझिटिव्ह; एकूण संख्या ३२२ वर !

संगमनेरात दिवसभरात ४० कोरोना पॉझिटिव; एकूण संख्या ३२२ वर 
संगमनेर/प्रतिनिधी :
संगमनेर तालुक्यात काल (गुरुवार दि.१६) दिवसभरात ४० कोरोना बाधित रुग्ण आढळून आहेत. सर्वात आधी काल दुपारी बारा कोरोना पॉझिटिव रुग्ण आढळले ज्यात शहरालगत असलेल्या ढोलवाडी येथील सहा, निमोणे येथील तीन तर घुलेवाडी, लख्मीपुरा आणि देविगल्ली येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश होता. 
संध्याकाळ पाच वाजेच्या सुमारास नव्याने आठ कोरोना बाधितांची भर पडून हा आकडा वीस वर जाऊन पोहोचला. शहरातील एका खाजगी लॅब कडून मिळालेल्या अहवालानुसार घुलेवाडी, रेहमतनगर येथील प्रत्येकी दोन रुग्ण, मालदाड रोड येथील तीन तर घोडेकर मळा येथील एका रुग्णाचा यात समावेश आहे. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी सात वाजता आणखी वीस रुग्णांची भर पडली आहे. त्यात निमोण येथील सात, कुरण, राजापूर, सुकेवाडी, घुलेवाडी, संगमनेर खुर्द गावातील एक, आणि शहरातील बागवानपुरा येथील चार व सय्यदबाबा चौकातील तीन रुग्ण कोरोना बाधित मिळून आले आहेत. त्यामुळे काल दिवसभरात रुग्णांची संख्या चाळीस इतकी झाली आहे. काल मिळून आलेल्या एकूण चाळीस कोरोना बाधितांची संख्या मिळवता तालुक्यात अद्याप ३२२ रुग्ण कोरोना बाधित झाले असून १४ जणांचा यात मृत्यू झाला आहे. दररोज एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित मिळून येत असताना प्रशासन यापुढे काय पाऊल उचलणार याकडे आता सामान्य संगमनेरकरांचे लक्ष लागून राहिले आहे.