Breaking News

संजीवनी डी फार्मसीचा निकाल १०० टक्के, भुशरा मनियार ९६. ०९ टक्के मिळवुन सर्व प्रथम !

संजीवनी  डी फार्मसीचा  निकाल १०० टक्के, भुशरा मनियार ९६. ०९ टक्के मिळवुन सर्व प्रथम  !

कोपरगांव / तालुका प्रतिनिधी 
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण  मंडळ, मुंबईने शैक्षणिक वर्ष  २०१९-२०  मध्ये प्रथम वर्ष  डी. फार्मसी मध्ये शिकत  असलेल्या विध्यार्थांचा  अंतर्गत गुण मुल्यांकणाच्या आधारे निकाल जाहिर केला असुन यात संजीवनी डी. फार्मसीचा निकाल १००  टक्के लागला आहे.  भुशरा फिरोज मनियार या विध्यार्थीनीने ९६. ०९ टक्के असे विक्रमी गुण मिळवुन सर्व प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान मिळविला आहे,  अशी  माहिती संजीवनी डी. फार्मसी संस्थेच्या वतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.  
पत्रकात पुढे म्हटले आहे की मुनिजा इलियास मनियार व प्रियंका नवनाथ निगल यांनी प्रत्येकी ९५ टक्के गुण मिळवुन दुसऱ्या  क्रमांकाच्या मानकरी ठरली तर विठ्ठल सुदाम आंधळे याने ९४. ९१ टक्के गुण मिळवुन तिसरा क्रमांक  मिळविला. याच बरोबर रूतुजा दिलीप बनकर (९३. ५५ टक्के), पल्लवी सोपान गायके (९२. २७ टक्के) व निलम सुर्यकांत निवारे (९१. १८ टक्के) असे गुण मिळवुन अनुक्रमे पुढील ४, ५ व ६ क्रमांकाचे मानकरी ठरले. या परीक्षेेत बहुतांशी  विध्यार्थांना ८० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळाल्याने पालक व विध्यार्थ्यांमध्ये  आनंदाचे वातावरन आहे. या निकालाने संजीवनी डी. फार्मसी संस्थेने उत्कृष्ट  निकालाची परंपरा कायम ठेवल्याचे किंबहुन चढता आलेख सिध्द केला आहे.
विध्यार्थ्यांच्या  या घवघवीत यशाबध्दल संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री श्री शंकरराव  कोल्हे, कार्याध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी श्री अमित कोल्हे यांनी सर्व गुणवंत विध्यार्थी व त्यांचे पालक, प्राचार्य डी. एन. पाटील व शिक्षकांचे  अभिनदन केले आहे