Breaking News

मुख्यमंत्र्याचा वाढदिवस कोपरगाव शिवसेनेच्या वतीने अनोख्या पद्धतीने साजरा केला !

मुख्यमंत्र्याचा वाढदिवस कोपरगाव शिवसेनेच्या वतीने अनोख्या पद्धतीने साजरा केला
करंजी/प्रतिनिधी :
शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री .उद्धवसाहेब ठाकरे
यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगांव शहर शिवसेना युवासेना ग्राहक संरक्षण कक्ष च्या वतिने कोपरगांव शहरामधे मास्क वाटप चा कार्यक्रम घेण्यात आला.
     महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस परंतु राज्यावर वाढते कोरोनाचे सावट असतांना दोन दिवसांपूर्वी श्री ठाकरे यांनी आपला वाढदिवस साजरा करणार नसून राज्यभरातील कार्यकर्तेनी देखील त्याचे पालन करावे असे आव्हान केले होते या आव्हानाला प्रतिसाद देत कोपरगाव शहरामधील प्रत्येक शिवसेना शाखेच्या ठिकाणी कोपरगाव शहरातील वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने नागरिकांना मास्क वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.
      या कार्यक्रमास शिवसेना शहरप्रमुख श्री सनी वाघ,
ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख श्री रविंद्र कथले, शिवसेना नगरसेवक श्री अनिल आव्हाड,
शिवसेना उपशहरप्रमुख श्री बालाजी गोर्डे,श्री संतोष जाधव,श्री कुणाल लोणारी,श्री अमोल शेलार,श्री सागर जाधव
शिवसेना संघटक श्री सनी काळे,श्री सागर फडे,श्री वसिम चोपदार,युवासेना तालुकाप्रमुख श्री सिद्धार्थ शेळके,युवासेना शहरप्रमुख श्री नितिष बोरुडे,
युवासेना उपशहरप्रमुख श्री शिवम नागरे,श्री रुशी धुमाळ,श्री मयुर फुकटे,श्री प्रीतेश जाधव,श्री अभिषेक सारंगधर,श्री विशाल औटी,श्री आशिष निकुंभ
युवासेना उपतालुकाप्रमुख श्री
विजय गोरडे,श्री अक्षय गुंजाळ,श्री विजय भोकरे,श्री प्रशांत बोरावके, श्री गणेश घुगे आदी  शिवसेना युवासेना कोपरगांव च्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र चे मुख्यमंत्री शिवसेना  पक्ष प्रमुख यांचा वाढदिवस अनोखा रित्या साजरा करत शुभेच्छा दिल्या.