Breaking News

लोणीमावळा येथील मुंबईहून आलेली वृद्ध महिला कोरोना बाधित !

पारनेर/प्रतिनिधी -
 पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथे मुंबईहून आलेली 72 वर्षीय महिलेला त्रास होत असल्याने तिला नगर येथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते तिथे तिचा कोरोना चाचणी साठी स्राव घेण्यात आला त्याचा अहवाल प्राप्त झाला असून तो पॉझिटिव प्राप्त झाला.
तालुक्यात कोरोना बधितांची संख्या दररोज वाढत आहे लोणीमावळा येथे विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलेल्या महिलेला अचानक त्रास जाणवत असल्यामुळे तिला नगर येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तिची कोरोना चाचणी करण्यात आली त्यात कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे
ही महिला दि 3 रोजी लोणीमावळा येथे आली होती तिला 4 तारखेला गावातील विलगीकरण कक्षामध्ये ठेवले होते त्यावेळेस तिला त्रास जाणवू लागल्याने नगर येथे पाठवण्यात आले होते.
तिच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील तिघाजणांना लोणीमावळा येथे विलगीकरण कशामध्ये ठेवण्यात आलेले आहेत त्यांची करोना चाचणीसाठी घेण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली आहे.