Breaking News

रयत च्या उत्तर नगर च्या सल्लागार पदी या आमदारांची निवड !

रयत च्या उत्तर नगर च्या सल्लागार पदी या आमदारांची निवड !
करंजी/प्रतिनिधी :
आशिया खंडातील सर्वात मोठी नावाजलेली शिक्षण संस्था म्हणून ज्या कडे पाहिले जाते ती डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सातारा या ठिकाणी स्थापन केली रयत शिक्षण संस्थेचे उत्तर नगर विभागीय सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपदी कोपरगाव चे आमदार आशुतोष काळे यांची निवड.
 सातारा या ठिकाणी डॉ कर्मवीरांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या छोट्याशा वडाचा रोपट्याला आज वटवृक्ष करण्यात महत्वाचा खारीचा वाटा असलेले नगर जिल्ह्याचे कर्मवीर माजी खासदार कै शंकरराव काळे साहेब हे होय त्यांनी नगर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आज रयत चा बहुसंख्य शाखा सुरू करून नगर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात देखील रयत वाढवण्याचे महत्वाचे कार्य खा काळे यांनी केले होते. त्यांचा नंतर त्यांचे सुपुत्र कोपरगाव चे माजी आमदार अशोक दादा काळे यांनी देखील रयत चा सर्व शाखांना जोपासण्याचे कार्य केले.
 त्यानंतर त्याचा वारसा जोमाने चालवणारे कर्मवीर शंकरराव काळे यांचे नातू आमदार आशुतोष काळे हे देखील रयत चा सर्व काळजीपूर्वक जोपासत असून याचीच दखल घेत रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री शरदचंद्र पवार साहेब यांनी आ काळे यांची उत्तर नगर जिल्ह्याचा विभागीय सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड करून आम काळे यांना एक मोठी संधी उपलब्ध करत तरूणांना साधी देण्यात आली  आहे.या निवडीबद्दल आम काळे चे सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.