Breaking News

उक्कडगाव महाविद्यालयाचा निकाल शेकडा ९७.२६% टक्के !


उक्कडगाव महाविद्यालयाचा निकाल शेकडा ९७.२६% टक्के.
कोपरगाव/प्रतिनिधी :
कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील शिवअमृत कनिष्ठ (विज्ञान) महाविद्यालय उक्कडगाव चा एच एस सी (१२वी) परीक्षेचा निकाल ९७.२६% टक्के लागला असून यात महाविद्यालयाचे हर्ष संचेती, महेश निकम, प्रतीक्षा निकम,ऋतुजा रजपूत, अनंता राऊत,दिपज्योत जपे,मिसवाह सय्यद, पवन त्रिभुवन, आयुष्य यादव,स्मिता ढमाले,हे विध्यार्थी विशेष प्रविण्याने मार्क मिळवत यशस्वी झाले आहे.
  तसेच महाविद्यालयाचे एकूण २६ विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत तर ३५ विद्यार्थी द्वितीय श्रेणीने उत्तीर्ण झाले आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे संस्थापक, प्राचार्य, सर्व शिक्षक व  शिक्षेकत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करत भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहे.