Breaking News

संगमनेरात नव्याने बारा कोरोना पॉझिटिव्ह !

संगमनेरात नव्याने बारा कोरोना पॉझिटिव्ह !

संगमनेर/प्रतिनिधी :
   संगमनेर तालुक्यात काल (बुधवार दि.१५) ५१ कोरोना पॉझिटिव रुग्ण सापडल्यानंतर, आज (गुरुवार दि.१६ ) दुपारी नव्याने बारा कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. घुलेवाडी ग्रामीण ग्रामीण रुग्णालयातून मिळालेल्या अहवालानुसार ११ रुग्ण तर शहरातील एका खाजगी लॅब मध्ये मिळून आलेला एक रुग्ण मिळून बारा रुग्णांची एकूण भर पडली आहे.
     यात शहरातील ढोलवाडी परिसरात सहा रुग्ण, घुलेवाडी, देविगल्ली आणि लख्मीपुरा येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे तर तालुक्यातील निमोणे येथील तीन रुग्णांचा समावेश आहे. आज बाधित झालेल्या बारा रुग्णांची संख्या मिळवता तालुक्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या २९७ वर जाऊन पोहोचली आहे.