Breaking News

स्वाभिमानीच्या दूध आंदोलनाला शेवगाव मध्ये उस्फूर्त प्रतिसाद !

स्वाभिमानीच्या दूध आंदोलनाला शेवगाव मध्ये उस्फूर्त प्रतिसाद !
घोटण/प्रतिनिधी: 
   स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर पुकारलेल्या एक दिवसीय लाक्षणिक दूध बंद आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक दिवस अगोदर संपूर्ण डेरी चालक दूध संकलन केंद्र चालक व शेतकरी यांना शेतकरी संघटनेच्या वतीने आव्हान करण्यात आले की दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान शासनाकडून मिळावे व पुढील तीन महिन्यांसाठी सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रति लिटर पाच रुपये अनुदान जमा करावे म्हणजे ३/५ फॅट  नुसार पंचवीस रुपये दर दुधाला देण्यात यावा या प्रमुख मागणीसह केंद्र शासनाने दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय शासनाने रद्द करावा,  ३० हजार टन दूध पावडर चा बफर स्टॉक तयार करावा तसेच दूध पावडर साठी प्रति किलो ३० रु. देण्यात यावेत त्याच प्रमाणे दूध पावडर, तूप,दही,बटर, श्रीखंड, पनीर इत्यादी दुग्धजंन्य पदार्थावरील जीएसटी पूर्णपणे रद्द करण्यात यावी व शेतकऱ्यांना शेती पूरक व्यवसाय म्हणून दूध व्यवसाय मोडकळीस येऊ नये, मोठ्या प्रमाणात वाढलेले पशुखाद्याचे दर कमी करावे .
        यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे, त्याचाच एक भाग म्हणून शेवगाव तालुक्यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सर्व दूध संकलन केंद्रांना आव्हान करण्यात आले होते. त्यांनी आपले संकलन केंद्र बंद ठेवून या आंदोलनास सहकार्य केले आहे,
      यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष जिल्हाध्यक्ष राऊसाहेब लवांडे, महिला जिल्हाध्यक्ष स्नेहलताई फुंदे शेवगाव तालुकाध्यक्ष प्रशांत भराट, संघटना तालुकाध्यक्ष प्रवीण म्हस्के, महिला तालुकाध्यक्ष बायजाबाई बटूळे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे, अमोल देवढे, मेजर अशोक भोसले, संदीप मोटकर, नानासाहेब कातकडे, प्रशांत घुमरे,नारायण पायघन, संतोष गायकवाड इत्यादी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यांमध्ये दूध आंदोलन यशस्वी केले.