Breaking News

पाथर्डी शहर २३ जुलैपर्यंत बंद;फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहणार !पाथर्डी शहर २३ जुलैपर्यंत बंद;फक्त अत्यावश्यक सेवा चालू राहणार 
रात्री उशिरा तहसीलदार नामदेव पाटील यांनी काढला आदेश
पाथर्डी/प्रतिनिधी :
पाथर्डी शहरात व तालुक्यात एकाच दिवसांत कोरोना रुग्णाच्या संख्येत मोठी भर पडली असून त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊ नये.यासाठी पाथर्डी शहर दि.२३ जुलै २०२० रोजी पर्यंत कंटेंटमेन्ट झोन घोषीत करण्यात आले आहे.या काळात फक्त अत्यावश्यक सेवा चालु राहणार आहेत.
     कालच्या दिवसाने पाथर्डीच्या  चिंतेत वाढ झाली.सगळ्यात सुरवातीला दुपारी १० तर संध्याकाळी ३२ असे एकाच दिवसांत ४२ जण कोरोनाबाधित झाल्याचा अहवाल आल्याने तालुक्याची चिंता वाढली आहे.शहरातील खाटीक गल्ली १४,आझाद चौक ८ असे तब्बल २२ रुग्ण आढळुन आले.त्यामुळे प्रशासनाच्या वतीने शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे.तसेच तालुक्यात आगासखांड ०२, कोल्हुबाई कोल्हार ११, तिसगाव ०३, त्रिभुवनवाडी ०४,येथे रुग्ण आढळून आले आहेत.
      तालुक्याचा कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ६० झाला असुन,आरोग्य विभागाकडुन ४९ रुग्णांवर उपचार चालु आहेत. तहसीलदार नामदेव पाटील,उपविभागीय अधिकारी मंदार जवळे,पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी,तालुका आरोग्य अधिकारी भगवान दराडे,मुख्याधिकारी धनंजय कोळेकर हे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या नियमांचे पालन करण्याचे   वेळोवेळी नागरीकांना आवाहन करत आहे.आता नागरीकांनी बेशिस्तपणे न वागता जबाबदारीने वागणे तालुक्यासाठी गरजेचे आहे.