Breaking News

कोपरगाव तालुक्यात आज ३ रुग्णाची भर !

कोपरगाव तालुक्यात आज ३ रुग्णाची भर
करंजी प्रतिनिधी- 
काल कोपरगाव शहरातील एक डॉक्टर व रवंदे येथील एक इसम असे २ रुग्ण आढळून आले होते प्रशासनाने त्यांचा संपर्कातील २० लोकांना पुढील तपासणीसाठी ताब्यात घेतले असता त्यात आज ३ पॉजिटीव्ह रुग्ण आढळून आले आहे.
  यात काल सापडलेले गोदाम गल्ली येथील डॉक्टराची ५८ वर्षीय पत्नी, व रवंदे येथील काल सापडलेल्या इसमाचा ३० वर्षीय मुलगा तसेच कोपरगाव कोर्ट रोड परिसरातील ५८ वर्षीय डॉक्टर देखील पॉजिटीव्ह आला असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
   आता कोपरगाव तालुक्यातील ऍक्टिव्ह रुग्णाची संख्या २१ झाली असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
      आज प्रलंबित २० अहवाल प्राप्त झाले असता त्यात तीन पॉझिटिव्ह तर १७ निगेटिव्ह आले  असुन अजूनही काही अहवाल प्रलंबित आहे, त्या मुळे नागरिकांनी अधिक सावधानता बाळगणे गरजेचे आहे.