Breaking News

आ. मोनिका राजळेंविरोधात मुंडेसमर्थकांत संताप

- भाजपच्या तालुका कार्यकारिणीत डावलले
- निवडणुकीत धडा शिकविण्याचा दिला इशारा

पाथर्डी/ प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाच्या तालुका कार्यकारीनीत पंकजा मुंडे यांच्या समर्थक व युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष अमोल गर्जे व ज्येष्ठ नेते अशोक गर्जे यांना डावलण्यात आल्यानंतर आमदार मोनिका राजळे यांच्याविरोधात तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे. विधानसभेला आमदार मोनिका राजळे यांच्या उमेदवारीला थेट विरोध करणारे अमोल गर्जे, संजय बडे, सुनिल पाखरे यांनादेखील तालुका संघटनेत स्थान मिळालेले नाही. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत धडा शिकवू, असा इशारा मुंडे समर्थकांनी दिला आहे.
भारतीय जनता पक्षाची जम्बो कार्यकारीणी तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यानी जाहीर केली आहे. यामधे ज्येष्ठ नेते अशोक गर्जे, भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, संजय बडे, सुनिल पाखरे, नागनाथ गर्जे यांना डावलण्यात आले. सुनिल पाखरे व नागनाथ गर्जे यांनी याबाबत पत्रक प्रसिद्ध करुन भाजपच्या मुळ निष्ठावंताना डावलले असून, मुंडे समर्थकांची कोंडी केल्याची भावना व्यक्त केली आहे. आगामी काळात आमदार मोनिका राजळे यांना जाहीरपणे विरोध करुन त्यांना हे खूनशी राजकारण महागात पडेल, असा इशारा पाखरे व गर्जे यांनी दिला. ज्येष्ठ नेते अशोक गर्जे हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक आहेत. पक्ष संघटनेत अनेक पदावर त्यांनी काम केले. त्यांचा मुलगा अमोल गर्जे हे भाजप युवा मोर्चाचे तालुकाअध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यांना बाजूला करण्यात आले आहे. पाखरे व गर्जे यांनी निवेदन नाराजी व्यक्त केली आहे. भारतीय जनता पक्षाला यामुळे संघटना पातळीवर नाराजीला सामोरे जावे लागणार आहे. तालुक्यात राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना अशी आघाडी झाल्याने भाजपाला येथे समर्थ विरोधक तयार झाला आहे. त्यात अंतर्गत गटबाजीला उधान आल्याने भाजपाला त्याचा तोटा सहन करावा लागण्याची शक्यता आहे.

आगामी काळात आमदार मोनिका राजळे यांना जाहीरपणे विरोध करुन त्यांना हे खूनशी राजकारण महागात पडेल, असा इशारा पाखरे व गर्जे यांनी दिला. ज्येष्ठ नेते अशोक गर्जे हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक आहेत. पक्ष संघटनेत अनेक पदावर त्यांनी काम केले. त्यांचा मुलगा अमोल गर्जे हे भाजप युवा मोर्चाचे तालुकाअध्यक्ष म्हणून काम पाहत होते. त्यांना बाजूला करण्यात आले आहे.