Breaking News

कोपरगाव तालुक्यातील कोरोना थांबेना !

कोपरगाव तालुक्यातील कोरोना थांबेना
करंजी प्रतिनिधी- 
आज कोपरगाव तालुक्यातील २० लोकांची अँटीझेन रॅपिड टेस्ट केली असता तालुक्यात ८ कोरोना रुग्ण पॉजिटीव्ह आढळुन आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे प्रमुख डॉ कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले आहे.
 यात कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागातील अनुक्रमे ५० व ४५ वर्षीय पुरुष, शिंदे शिंगी नगर येथील ४९ वर्षीय पुरुष ३६ वर्षीय महिला,स्वामी समर्थ नगर येथील अनुक्रमे ६६ व २१ वर्षीय महिला तसेच ५४ वर्षीय पुरुष व तालुक्यातील कोळपेवाडी येथील २७ वर्षीय पुरुष रुग्ण कोरोना बाधित आढळुन आले त्यामुळे प्रशासनाच्या वतीने आव्हान करण्यात येते की  सर्व नागरिकांनी प्रशासनाचे नियम काटेकोर पाळत काळजी घेणे गरजेचे आहे.