Breaking News

पिचडांचे लहामटेना आव्हान तुम्ही हे धरणे बंधारे बांधून दाखवाच

अकोले/प्रतिनिधी- सुनील गीते
   मी चाळीस वर्षात काय केले हा विरोधकांचा आरोप माजी मंत्री मधुकर पिचड यांनी खोडताना, तालुक्यात पिंपळगाव खांड सारखे अनेक धरणे बांधून तालुका सुजलाम सुफलाम करून आज शेतकरी त्याच्या पायावर भक्कम उभा आहे मात्र विरोधकांनी काय केले त्याचे एक उदाहरण दाखवा , तालुक्यात आजही १० जागा पाणी अडविण्यासाठी असून मी जागा दाखवतो विरोधकांनी एखादे धरण किंवा बंधारा  बांधून दाखवावा असे आवाहन माजीमंत्री पिचड यांनी केले. मुळा व पठार भागाला वरदान ठरलेले  पिंपळगाव खांड धरण हे ओव्हर फ्लो झाले असल्याने त्याचे जलपूजन माजीमंत्री तथा भाजपचे राज्य कार्यकारिणी निमंत्रित सदस्य  मधुकरराव पिचड . माजीआमदार वैभवराव पिचड ,जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम पा. गायकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
          धरणाच्या पाण्याचे पूजन  साडी चोळी जलाशयात अर्पण करण्यात आली.यावेळी माजी मंत्री पिचड यांनी   जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना कर्ज बाबत घेतलेल्या  धाडशी निर्णयाचे स्वागत  केले. प्रसंगी माजी आमदार वैभवराव पिचड  सीताराम पा.गायकर , सीताराम पाटील देश मुख यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले .पत्रकारांशी वार्तालाप करताना माजीमंत्री पिचड म्हणाले, मी तालुक्यात १३ लघु व माध्यम २ अशी १५ जलाशयाची साखळी उभी केली. त्यामुळे शेतीला पाणी , पिण्यासाठी पाणी , उपसासिंचन योजना काही खाजगी , सामुदायिक पाणी पुरवठा योजना, त्यासाठी राज्य सरकार कडून निधीची उपलब्धता केली . त्यामुळे शेती शिवार हिरवे झाले .
           शेतकरी सर्वसामान्य कुटुंबात आमूलाग्र बदल झाला हा बदल कसा झाला हे विरोधकांनी पाहावे म्हणे ४० वर्षात काय केले? .विरोधकांना माझे आव्हान आहे की, तुम्ही एक तरी धरण बांधून दाखवा मी जागा दाखवतो तालुक्यात खेतेवाडी , फोफसंडी ,केली , (खरचुंडी ) केळी ,वागदरी तळे मध्ये , अप्पर आंबित , मेहदुरी (घोगस ),मान्हेरे  (माकडडोह ) एकंदर (पिंपळदरा वाडी ) अशी दहा ठिकाणे आहेत त्यातील एक तरी मंजूर करून मार्गी लावा, तुम्हाला जमत नसेल तर मला सांगा. मात्र खोटे बिनबुडाचे आरोप करू नका, असा सल्ला विरोधकांना दिला . यावेळी अगस्ति चे संचालक मच्छिन्द्र धुमाळ , महेश नवले , प्रकाश मालुंजकर , बाळासाहेब ताजने , राजेंद्र डावरे ,अशोक देशमुख ,सरपंच भाऊसाहेब शेटे , भाजप तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे,अगस्तीचे कार्यकारी संचालक भास्कर घुले उपस्थित होते .