Breaking News

मंत्री गडाख यांच्या पत्नीला कोरोना.... मंत्री गडाख कोरोनटाईन !

मंत्री गडाख यांच्या पत्नीला कोरोना.... मंत्री गडाख कोरोनटाईन !
नेवासा तालुका प्रतिनिधी: 
राज्याचे जलसंधारणमंत्री व नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख यांच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली असल्याचा अहवाल प्राप्त झाला असून मंत्री गडाख स्वत:हून क्वारंटाइन झाले आहेत.
शंकरराव गडाख यांच्या पत्नी पंचायत समिती माजी सभापती सुनीता गडाख यांचा १७ जुलै रोजी कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे शंकरराव गडाख यांनी होम क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला आहे.त्यांची १८ जुलै रोजी तातडीनं कोरोना चाचणी घेण्यात आली आहे.त्यांनी या संदर्भात ट्वीट करून नागरिकांना घरी रहा सुरक्षित रहा,कुटुंबाची काळजी घ्या सल्ला दिला.