Breaking News

बेलवंडी सेवा संस्थेचे संचालक दातिर यांचा चेअरमन व सचिव यांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा.

बेलवंडी सेवा संस्थेचे संचालक दातिर यांचा चेअरमन व सचिव यांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा.

कोळगाव/प्रतिनिधी :
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्थेचे स्वीकृत संचालक भाऊसाहेब दातिर यांनी सहाय्यक निबंधक श्रीगोंदा यांच्याकडे राजीनामा देत संस्थेच्या चेअरमन व सचिव यांच्या त्रासाला कंटाळून संस्थेच्या गलथान कारभाराची, कर्ज विषयी मनमानी या विषयी तक्रार केली.
                    या विषयी सविस्तर असे की श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्थेचे स्वीकृत संचालक भाऊसाहेब दातिर यांनी कर्ज मिळविण्यासाठी लागणारी "क " मंजुरीसाठी सुमारे एक वर्षापूर्वी अर्ज केला होता. जून महिन्यात कर्जाची मागणी केली असता त्यांनी देतो देतो असे सांगत एक महिन्या नंतर तुमची " क " मंजुरी नसल्याने तुम्हाला कर्ज देता येत नाही असे सांगत कर्ज देण्यास नकार दिल्याने दातीर यांनी सहाय्यक निबंधक श्रीगोंदा यांच्याकडे राजीनामा देत संस्थेच्या चेअरमन व सचिव यांच्या त्रासाला कंटाळून संस्थेच्या गलथान कारभाराची, कर्ज विषयी मनमानी या विषयी तक्रार करत संस्थेच्या चेअरमन व सचिव यांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली.