Breaking News

कु. मानसी दरंदले दहावीच्या इंग्रजी माध्यमांच्या परिक्षेत पहिली !

कु. मानसी दरंदले दहावीच्या इंग्रजी माध्यमांच्या परिक्षेत पहिली     
   नेवासा तालुका प्रतिनिधी :
नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील सुलोचना बेल्हेकर शिक्षण संस्था संचलित ज्ञानेश्वर पब्लिक स्कूल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील इयत्ता दहावीच्या परिक्षेत मानसी चंद्रकांत दरंदले हिने ७३ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला असून त्याबद्दल तीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
   या परिक्षेत भारत प्रकाश इंगळे (७२ टक्के)  याने द्वितीय तर दुर्गेश बबनराव पाटील (७१.४०) याने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
   सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश बेल्हेकर, संचालिका डॉ.सौ.रंजना बेल्हेकर,  प्राचार्य शशिकांत देवरे, उपप्राचार्य राकेश हिरे यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व नेवासा तालुका एकता पत्रकार संघटनेच्या वतीने अभिनंदन केले आहे.