Breaking News

संगमनेरात पुन्हा आठ कोरोना पॉझिटिव्ह, आज दिवसभरात २०; तर एकूण आकडा तीनशेच्या पार .

संगमनेरात पुन्हा आठ कोरोना पॉझिटिव्ह, आज दिवसभरात २०; तर एकूण आकडा तीनशेच्या पार 
संगमनेर/प्रतिनिधी :
संगमनेर  तालुक्यात आज (गुरुवार दि.१६) दुपारी बारा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असताना संध्याकाळ होता होता नव्याने आठ कोरोना बाधितांची भर पडून दिवसभरात एकूण वीस रुग्ण समोर आले आहेत. आताच शहरातील एका खाजगी लॅब कडून मिळालेल्या अहवालानुसार घुलेवाडी, रेहमतनगर येथील प्रत्येकी दोन रुग्ण, मालदाड रोड येथील तीन तर घोडेकर मळा येथील एका रुग्णाचा यात समावेश आहे. आज मिळून आलेल्या एकूण वीस कोरोना बाधितांची संख्या मिळवता संगमनेर तालुक्याने तीनशेचा टप्पा पार केला आहे. अद्याप पोहोत तालुक्यात ३०५ रुग्ण कोरोना बाधित झाले असून १४ जणांचा यात मृत्यू झाला आहे.