Breaking News

मांडवे खुर्द ते खडकवाडी परिसरातील घाटात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला !

मांडवे खुर्द ते खडकवाडी परिसरातील घाटात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला !
पारनेर प्रतिनिधी- 
पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द ते खडकवाडी रोडवर घाटामध्ये एका वळणावर तीस ते चाळीस वर्षे वयाचे पुरुष जातीचे प्रेत कुजलेल्या स्थितीत आढळून आले आहे याबाबत चिमा महादेव चिकणे वय 45 वर्ष राहणार खडकवाडी ता पारनेर यांनी पारनेर पोलीस स्टेशन मध्ये माहिती दिली आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि 26 रोजी 3 च्या सुमारास मांडवे खुर्द ते खडकवाडी रोडवर घाटमाथ्यावर 30 ते 40 वर्षे वयाच्या पुरुष जातीचे प्रेत कुजलेल्या स्थितीमध्ये पडलेले आढळून आले त्या ठिकाणी जंगली प्राण्यांनी कुरतडलेले व खाल्ल्याचे अवस्थेत आहे मयताच्या  खिशात सापडलेल्या फोटो वरून मयताची ओळख पटवण्याचे काम सध्या पोलीस करत आहेत अशी माहिती पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी दिली आहे.