Breaking News

धक्कादायक ! श्रीरामपुरात कोरोनाचा उद्रेक एकाच दिवशी सापडले २३ रुग्ण बाधितांची संख्या ६७ वर

धक्कादायक ! श्रीरामपुरात कोरोनाचा उद्रेक एकाच दिवशी सापडले २३ रुग्ण बाधितांची संख्या ६७ वर
बेलापूर/प्रतिनिधी :- 
श्रीरामपूर शहरात आज कोरोनाचा उद्रेक झालेला दिसून येत आहे श्रीरामपूर शहरातील २१ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या असून २ जणांचे खाजगी प्रयोगशाळेतील रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे त्यामधील एक जण हा ममदापूरचा असून दुसरा हा श्रीरामपूर शहरातील आहे असे एकूण २३ जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे अशी माहिती श्रीरामपूरचे आरोग्य अधिकारी डॉ मोहन शिंदे यांनी दिले असून श्रीरामपूर आतील अजून ११५ जणांचे स्त्राव चे रिपोर्ट येणे बाकी आहे आता श्रीरामपूरातील रुग्णांची संख्या ही ६७ वर गेली आहे तरी श्रीरामपूर शहरातील नागरिकांनी आता तरी शासनाचे नियम पाळावे विनाकारण घराच्या बाहेर पडू नये स्वतःची काळजी घ्यावी. तोंडाला मास्क वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ मोहन शिंदे यांनी श्रीरामपुरातील नागरिकांना केले आहे.