Breaking News

पंजाबच्या एका मंत्र्याला कोरोनाची लागण !

चंदीगड वृत्तसंस्था : 
कोरोनाचा फैलाव थांबयचे नाव घेत नाही. असे असले तरी कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, देशात आणखी एका मंत्र्याला कोरोनाची बाधा झाल्याचे पुढे आले आहे. पंजाबचे उच्च शिक्षण मंत्री तृप्त राजिंदर सिंह बाजवा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या पहिला अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर दुसरा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पंजाबचे मंत्री बाजवा यांना कोरोनाची लागण
१० जुलै रोजी कॅबिनेट मंत्री राजिंदर सिंह बाजवा यांनी आपली कोरोना टेस्ट केली होती. याआधी देखील राज्यातील अनेक उच्च अधिकाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळले आहेत. पण राज्य सरकारच्या मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली असल्याची पहिलीच घटना आहे. त्यामुळे पंजाब सरकारमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.