Breaking News

नित्कृष्ट रस्त्याच्या कामाच्या चौकशीसाठी मनसेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन !

नित्कृष्ट रस्त्याच्या कामाच्या  चौकशीसाठी मनसेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन !
कोपरगाव / तालुका प्रतिनिधी 
कोपरगांव  सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत  टाकळी नाका ते टाकळी असा डांबरी रस्ता नुकताच  करण्यात आला असून तो रस्ता अतिशय नित्कृष्ट  दर्जाचा झालेला आहे. या संदर्भात कोपरगाव मनसेचे शहराध्यक्ष सतिश  काकडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे  शाखा अभियंता बि.बि. गाढे यांना  निवेदन दिले 
  या निवेदनात  म्हटले आहे की   सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत  टाकळी नाका ते टाकळी असा डांबरी रस्ता नुकताच  करण्यात आला असून तो रस्ता अतिशय नित्कृष्ट  दर्जाचा झालेला आहे.  तो रस्ता अनेक वर्षानंतर झालेला असून त्या रस्त्याचे काम करणाऱ्या  ठेकेदारांनी निष्काळजीपणा केल्यामुळे  रस्त्याला  मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे आपघाताचे प्रमाण वाढत आहे.  तसेच रस्त्याला साईडपट्टी नाही, रुंदीचे प्रमाण नाही. दगडाची पिचींग नसून डांबराचा थर  तर कुठच दिसत नसून तो रस्ता जुना आहे की नवीन  हेच कळत नाही. तसेच  सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता  प्रशांत  वाकचौरे व  गाडे  यांना   २३जूलै २०२० रोजी फोन करुन रस्त्या संदर्भात विचारणा केली असता तेथे येतो असे सांगुन ते आलेच नसून वेळकाढूपणा केला आणि या विषयावर कांहीच बोलण्यास तयार नसुन या रस्त्यामुळे जनतेची सरळ सरळ फसवणुक होत असून या रस्त्याच्या कामात लाखो रुपयाचा घोटाळा झालेला समोर येत असून सदर रस्ता त्वरीत पुन्हा व्यवस्थीत करण्यात यावा अन्यथा मनसे स्टाईलने  आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. या निवेदनावर मनसे शहराध्यक्ष सतिश काकडे , मा. तालुकाध्यक्ष अलिम शहा, उपशहराध्यक्ष अनिल गाडे, विजय सुपेकर ,रघुनाथ मोहिते , संजय चव्हाण , संजय जाधव,  बंटी सपकाळ, नितिन त्रिभुवन, जावेद शेख,  सचिन खैरे, सागर महापुरे, आनंद परदेशी,  जाधव, बापू काकडे, नवनाथ मोहिते, यांच्या सह्या आहेत