Breaking News

पारनेर-संगमनेर'ला जोडणाऱ्या रस्ताची दुरवस्था, प्रवास बनला जीवघेणा !

रस्त्यावर खडी व कच पडूनही बांधकाम विभागाचे घोडे कुठे आडले !
------------
सर्वसामान्य नागरिकांचा जीव स्वस्त झालाय का ?
------------
पारनेर-संगमनेर'ला जोडणाऱ्या रस्ताची दुरवस्था,प्रवास बनला जीवघेणा!
 ----------
भूमिपुत्र शेतकरी युवक संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अमोल उगले यांचा आंदोलनाचा इशारा
-----------
【पारनेर व संगमनेरला जोडणाऱ्या टाकळी ढोकेश्वर साकुर रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून सहा महिन्यापूर्वी खडी  व कच टाकूनही बांधकाम विभाग का झोपले आहे. हेच कळत नसून रस्ता लवकर दुरुस्त करा अन्यथा भूमिपुत्र शेतकरी संघटना आता आक्रमक भूमिका घेईल. 】
(अमोल उगले (जिल्हाध्यक्ष भूमिपुत्र शेतकरी युवक संघटना, अहमदनगर)

टाकळी ढोकेश्वर/प्रतिनिधी :
पारनेर व संगमनेर ला जोडणाऱ्या टाकळी ढोकेश्वर ते साकुर या रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून गेले अनेक महिने पडून असलेली खडी आणि कच यामुळे या रस्त्यावर अनेक जीवघेणे अपघात सुध्दा होत आहेत. रस्त्याने प्रवास करत असताना सामान्य नागरिकांना आपला जीव मुठीत घालून प्रवास करावा लागत आहे. प्रशासन ठेकेदार हे काम का करत नाही हे एक कोडेच असून सार्वजनिक बांधकाम विभागाला आता प्रश्न विचरण्याची वेळ आली  आहे. सामान्य नागरिकांचे कोणालाही देणे घेणे राहिलेले नसून नागरिकांच्या मूलभूत हक्कांकडे सोयीसुविधाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. 
          कोणताच राजकीय पुढारी या विषयावर बोलत नसून या रास्ताने अनेक विद्यार्थ्यांना सुद्धा टाकळी ढोकेश्वर या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी जीव मुठीत घेऊन जावे लागते. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर हे मोठे बाजार पेठेचे ठिकाण असल्यामुळे या परिसरातील जवळपास पंधरा ते वीस गावाचा संपर्क या रस्त्याशी येतो आहे. टाकळी ढोकेश्वर वरून साकुर कडे जाणारा हा मुख्य रस्ता आहे. 
      हा रस्ता पारनेर ते संगमनेर या दोन तालुक्याना जोडणारा रस्ता असून या रस्त्याची अवस्था दयनीय स्वरूपाची झाली असून आता रस्त्यावरील कच आणि खडी घेऊन रस्त्यातच वृक्षारोपण करून गांधीगिरी करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाडेकर व राज्य संपर्क प्रमुख अशोक आंधळे यांच्या नेतृत्वाखाली भूमिपुत्र शेतकरी युवक संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष अमोल उगले, पारनेर तालुकाध्यक्ष सचिन सैद, पारनेर तालुका प्रवक्ते राजू रोकडे, तालुका उपाध्यक्ष विशाल सोनवणे, पारनेर विद्यार्थी संघटना सचिव विशाल गागरे, वासुंदे शाखाध्यक्ष महेश झावरे पाटील यांच्या वतीने देण्यात आला आहे. 
           सदर आंदोलनाची दखल घेऊन त्वरित काम सुरू न केल्यास अधिकारी व ठेकेदार यांना जबाबदार धरण्यात येईल व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात जाऊन आंदोलन करण्यात येईल असा इशारा भूमिपुत्र शेतकरी संघटनेनेच्या पदाधिकाऱ्यांनी  दिला आहे. 

.....