Breaking News

प्रभाग क्रमांक ४ व ८ मध्ये पथदिवे लवकर बसवावे :- मनसे अन्यथा आंदोलन

प्रभाग क्रमांक ४ व ८ मध्ये पथदिवे लवकर बसवावे :- मनसे अन्यथा आंदोलन 
जामखेड प्रतिनिधी 
शहरातील प्रभाग क्रमांक .४ व ८,मधील मिलिंद नगर येथील वीज पुरवठा व पथदिवे बंद आहेत. गेल्या ३ वर्षापासुन फक्त पोल बसवले आहेत परंतु त्यावर कसल्याही प्रकारचा वीज पुरवठा चालू झालेला नाही. या भागातील नागरिकांना रात्री अपरात्री लाईट नसल्याने  मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी लवकरात लवकर या भागात पथदिवे बसवावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते यांना निवेदन देण्यात आले. 
निवेदनावर मनसे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, सरपंच पै.हवा सरनोबत, उपाध्यक्ष सनी सदाफुले, गणेश पवार, बालाजी भोसले, महेंद्र सदाफुले, गोरख गंगावणे, तुषार शिरोळे, मनोज जगताप, सदींप गायकवाड, विठल शेळके, जालिंदर सदाफुले, रवी कांबळे, विशाल समिंदर, पिनु सदाफुले, सिध्दार्थ पारवे व नागरिकांच्या सह्या आहेत