Breaking News

पाथर्डी शहरातील फुलेनगर येथील अहवाल निगेटिव्ह; तर खेर्डे येथील २ जण कोरोनाबाधित

पाथर्डी /प्रतिनिधी : 
   दोन दिवसांपुर्वी तालुक्यातील खेर्डे येथील ३३ वर्षीय युवक व शहरातील फुलेगनगर विद्या कॉलनी येथील ७५ वर्षीय वयोवृद्ध महिला कोरोनाबधित झाले होते.त्यानंतर फुलेनगर येथील रुग्णाच्या संपर्कात आलेल्या कुटुंबातील चार जणांना तसेच खेर्डे येथील रुग्णांचा संपर्कात आलेल्या सहा जणांना आरोग्य विभागाने उपजिल्हा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवत.त्यांचे घशातील स्त्राव अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आल्याने शहराचे टेंशन वाढले होते.
       त्यां दहा अहवालापैकी आज फुलेनगर येथील चारही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर खेर्डे येथील रुग्णांच्या संपर्कात आलेला भाऊ (वय ३०) व वडील (वय ६५) या दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांनी दिली आहे.कोरोनाबाधितचा आकडा ११ वर पोहचला आहे.
      फुलेनगर येथील सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने शहरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.तर प्रशासनाकडून नियमाचे पालन करण्याचे अहवान करण्यात आले आहे.