Breaking News

आंबेडकरी अनुयायांचे प्रेरणास्थान असणाऱ्या राजगृहावर तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी- भारतीय बौद्ध महासभा

आंबेडकरी अनुयायांचे प्रेरणास्थान असणाऱ्या राजगृहावर तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी- भारतीय बौद्ध महासभा 

जामखेड प्रतिनिधी :
महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह या निवासस्थानी तोडफोड करणाऱ्या माथेफिरू समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी भारतीय बौध्द महासभेच्या वतीने तहसिलदार विशाल नाईकवाडे व पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांना निवेदन देण्यात आले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती व वास्तूचा ठेवा असणारे मुंबईतील राजगुरू निवास्थान देशभरातील आंबेडकरी अनुयायांचे प्रेरणास्थान असून या राजगृहावर तोडफोड करण्यात आलेल्या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे. संबंधित माथेफिरूवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. 

यावेळी महासभेचे तालुकाध्यक्ष महेंद्र घायतडक, शहराध्यक्षा सुरेखा सदाफुले, ह. गो कदम गुरूजी, पी वाय सदाफुले, अनिल सदाफुले, अरूणा सदाफुले, सदाफुले ताई, पंडित मोरे, आण्णा घोडेस्वार, रतन सदाफुले, सुर्यकांत सदाफुले, बापूसाहेब गायकवाड, मोरे, जोगेंद्र घोडेस्वार, इंजिनिअर घोडेस्वार  आदी उपस्थित होते.