Breaking News

श्रावण महिन्यात घरातून देवाचे नामस्मरण करा- मा सभापती

श्रावण महिन्यात घरातून देवाचे नामस्मरण करा- मा सभापती
करंजी प्रतिनिधी- 
     वाढता कोरोना लक्ष्यात घेता कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती व टाकळी येथील प्रगतशील शेतकरी श्री सुनील देवकर यांनी चला संकल्प करूया ,एक तरी पारायण घराघरात करूया: सध्याच्या कोरोना च्या जागतिक महामारी ने मानव जातीवर संकट कोसळले आहे .त्यामुळे सर्वजण प्रचंड अस्वस्थ झाले आहे. ज्यावेळी जगावर संकट येते ते त्या वेळी भारतीय संस्कृती जगाला मार्गदर्शक ठरली आहे .भारतातील योग शिक्षण पारायण यामधून माणसाची आत्मशक्ती वाढते .यातून शरीराची प्रतिकार शक्ती वाढते आणि आपण कोणत्याही नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी सज्ज होतो .मनशांती मिळवायचे असेल तर आजच्या श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवसापासून घराघरात एक तरी पारायण होणे अतिशय महत्त्वाचे आहे.
      यामधून भारतीय संस्कृतीचा असलेला महिमा वाढू शकतो आणि माणूस जास्तीत जास्त घरात राहून सुरक्षित राहू शकतो. देवांचा देव महादेव यांची आराधना श्रावण महिन्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. आपण घरामध्ये पारायण करून घरातील वातावरण प्रसन्न ठेवू शकतो .आपल्या मनाचा विकास साधण्या बरोबरच परमेश्वराच्या जवळ जाण्याची संधी निसर्गाने श्रावण महिन्याच्या निमित्ताने आपल्याला दिली आहे .श्रावण महिना मोठा आनंदाला नाही तोटा|| असे म्हणतात आपण घरीच राहून सुरक्षित राहून आपला वेळ जास्तीत जास्त देवाच्या सहवासात घालवावा आणि त्यामुळे न कळत आपले प्रशासनास सहकार्य झाल्याशिवाय राहणार नाही .आपल्या कुटुंबाची प्रगती करण्यासाठी ,घरातील मुलांवर संस्कार करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये सर्वांनी एक तरी पारायण करण्याचा आणि रामायण-महाभारताचा आदर्श जगासमोर ठेवण्याचा संकल्प करायला काय हरकत आहे, अशी इच्छा कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती शिवभक्त सुनीलराव देवकर यांनी व्यक्त केली आहे.