Breaking News

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक राहुल भंडारे यांच्याकडून आर्सेनिक गोळ्यांचे वाटप.

कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक राहुल भंडारे यांच्याकडून आर्सेनिक गोळ्यांचे वाटप.
पुणे :
  प्रभाग क्रमांक ०३ , अ , पुणे मनपा चे नगरसेवक राहुल आप्पा भंडारे यांनी कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर १८मार्च पासून ते आजपर्यंत त्यांनी लोकांना हवी ती मदत केली आहे. त्यांनी स्वखर्चाने ८ ते साडे आठ हजार कुटुंबांना मोफत धान्य वाटप केले.प्रत्येक नागरीकांचे जैन संघटनेच्या सहकार्याने थर्मल स्कॅनिंग व प्राथमिक तपासणी करुन घेत, मोफत वैद्यकीय उपचार केले. नागरिकांची रोग प्रतिकारक शक्ती वाढविणा-या आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथी गोळ्यांसह मास्क चे वाटप केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हॅन्ड फ्रि सॅनेटायजर मशीनचे स्वखर्चाने वाटप केले. कार्यकर्त्यांच्या मदतीने दरोदारी जाऊन जनजागृती केली. हे काम करीत असताना आपल्याला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, खासदार संजय नाना काकडे,भाजपा पुणे शहराध्यक्ष, जगदिशजी मुळीक यांचे सात्त्याने मार्गदर्शन लाभत असल्याचे भंडारे यांनी सांगितले.