Breaking News

कारगिल विजय दिनानिमित्त येळपणे येथे खंडेश्वर आजी माजी सैनिक बहुउद्देशीय संघटनेच्या वतीने शहिदांना आदरांजली अर्पण !

कारगिल विजय दिनानिमित्त येळपणे येथे खंडेश्वर आजी माजी सैनिक  बहुउद्देशीय संघटनेच्या वतीने शहिदांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
 
येळपणे/प्रतिनिधी :- 
 श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथे कारगिल विजय दिनानिमित्त  खंडेश्वर आजी माजी सैनिक बहुउद्देशीय संघटनेच्या वतीने शहिदांना आदरांजली वाहण्यात आली.
१९९९ साली झालेल्या कारगिल युध्दात भारतीय लष्कराने पाकिस्तानी लष्करावर विजय संपादन केला,पाकव्याप्त दोनशे स्क्वेअर की.मी भारतीय भुमी भारतीय लष्काराने यात पुन्हा मिळवली.देशातील ५२७ जवान या लढाईत शहीद झाले.कारगील लढाईनंतर जम्मु-काश्मीर मधील राजौरी सेक्टर सुरनकोट व नौशेरा सेक्टर मध्ये राबवलेल्या ‘ऑपरेशन रक्षक’ कारवाईत आतंकवाद्यां विरुध्द लढताना शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहण्यात आली.कारगिल विजय दिनास आज २१ वर्ष पुर्ण झाले, त्यानिमित्ताने येळपणे खंडेश्वर आजी माजी संघटनेच्या वतीने शहिद झाल्यालेल्या जवानांना  आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी येळपणे गावचे उपसरपंच गणेश पवार, माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय काळे,
तुकाराम राऊत, सुनील नाना लोखंडे, बबन डफळ, भानुदास पवार, भाऊसाहेब पवार ,सतीश खामकर, वामन लोखंडे ,विकास  क्षीरसागर, नवनाथ काळे,युवराज पवार संघटनेचे अध्यक्ष दादाभाऊ गावडे उपाध्यक्ष सदाशिव शिरसागर सचिव संदीप सांगळे  सचिन सांगळे,रवी ठाणगे, तसेच संघटनेचे सर्व सदस्य उपस्थित होते.