Breaking News

अकोले पंचायत समिती सभापती पदावर उर्मिला राऊत यांची निवड !

अकोले पंचायत समिती सभापती पदावर उर्मिला राऊत  यांची निवड
 अकोले /प्रतिनिधी
अकोले पंचायत समिती सभापती पदावर आज  भाजप च्या उर्मिला राऊत यांनी निवड करण्यात आली सभापती पदा साठी उर्मिला राऊत यांचा एकमेव अर्ज आल्याने  उर्मिला राऊत यांची  बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले
  दत्तात्रय बोऱ्हाडे यांचे अपघाती निधन झाल्याने  सभापती पद गेल्या काही दिवसांपासून रिक्त होते या पदावर निवड  करण्यासाठी आज पीठासीन अधिकारी शशिकांत  मंगरूळे यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली पंचायत समिती मध्ये आज निवडणूक प्रक्रिया पार पडली.
   माजीमंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभव पिचड याचे  नेतृत्वाखालील  भाजपच्या  मवेशी गणातून निवडून आलेल्या उर्मिला राऊत  यांची  बिनविरोध निवड झाली  यामुळे पंचायत समितीवर पुन्हा कमळ फुलले आहे  सेना राष्ट्रवादी व डॉ किरण लहामटे यांनी  या निवडणुकीत उमेदवार उभा केला  नाही यामुळे निवडणुकीला राजकीय रंग आला  नाही. उर्मिला राऊत यांचा एकच अर्ज आल्याने पिचड समर्थक उर्मिला राऊत यांची  निवड झाल्याचे  जाहीर केले.
निवडीनंतर  भाजपच्या पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत  दिवंगत सभापती दत्तात्रय बोऱ्हाडे यांना श्रद्धांजली अर्पण करून नव निर्वाचित  सभापती उर्मिला राऊत यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी आमदार वैभव पिचड  जिल्हा बँकेचे  चेअरमन सीताराम  पाटील गायकर, जिल्हा परिषदेचे माजी बाधकाम सभापती  कैलास वाकचौरे, गटनेते जालिंदर वाकचौरे, ,गिरजाजी जाधव सीताराम भांगरे  काशिनाथ साबळे उपसभापती दत्तात्रय देशमुख, सीताबाई गोंदके, रंजना मेंगाळ ,सारिका कडाळी अलका अवसरकर ,माधवी जगधने, गोरख पथवे आदी उपस्थित होते
मधुकरराव पिचड, वैभव पिचड यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थकी करून   सर्वांना विश्वासात घेऊन बांधकाम, शिक्षण आरोग्य असे प्रश्न प्राधान्याने  मार्गी लावू असे नूतन  सभापती उर्मिला राऊत यांनी सांगितले 
 पंचायत  समिती वर  माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांनी पुन्हा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
-----------