Breaking News

चोरांनी पोलिसदादाचेच घर फोडले !

चोरांनी पोलिसदादाचेच घर फोडले !
कायदा व सुव्यवस्था नावापुरती शिल्लक राहिली , पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला.

देवळाली प्रवरा प्रतिनिधी 
         राहुरी शहरात नेहमी चोऱ्या होतात. सर्वसामान्यापासून श्रीमंतांपर्यंत सर्वांचेच घरे किंवा बंगले फोडले आहेत. चोरांनी थेट पोलिसदादाचे घर फोडून पोलिसांना एक प्रकारे जाहिर आवाहन दिले आहे. घराकडेच मोर्चा वळवला. तालुक्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आहे.पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला  आहे.

             मागील वर्षभरापासून घरफोडी, दरोड्याच्या गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख अपयशी ठरले आहेत. आता, त्यांच्याच हाताखाली काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरात चोरी करून, चोरट्यांनी आव्हान दिले आहे.
              लोखंडी कपाटातील वीस हजार रुपये व लाकडी कपाटातील सोन्या-चांदीचे 40 हजार रुपये किमतीचे दागिने असा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

               छाया वैभव साळवे (वय 36, रा. बिरोबानगर, राहुरी) यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन बागूल यांनी घटनास्थळी पाहणी केली.